
सोनई : नेवासा तालुक्यातील धनगरवाडी येथे जागेच्या वादातून एका व्यक्तीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी आंबादास भाऊसाहेब डोईफोडे (वय ४७, रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांनी घराच्या पाठीमागील शेताच्या बांधावर गाय बांधली होती.

त्या ठिकाणी फिर्यादी गायेला चारा टाकत असताना आरोपी तेथे आले. तु आमच्या जागेत गाय का बांधली ? असे म्हणत आरोपींनी फिर्यादीस हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. तसेच तू घरदार सोडून जा, तुझ्या भावाला इथून काढून दिले आहे. तूही निघून जा, नाहीतर दहा दिवसांत तुझा काटा काढू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे डोईफोडे कुटुंब भयभीत झाले असून, आमच्या कुटुंबास काही बरेवाईट झाल्यास संबंधित आरोपी जबाबदार राहतील, असे निवेदन उषा डोईफोडे यांनी दिले आहे.

या प्रकरणी नवनाथ घमाजी डफाळ, घमाजी गणपत डफाळ, अभिजित रेवणनाथ डफाळ व रेवणनाथ गणपत डफाळ (सर्व रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांच्याविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

