नेवासा बु. — डॉले वस्ती, नेवासा बु. येथे जप्त करण्यात आलेल्या वाळू स्टॉकच्या पंचनाम्यानंतरही तो उचलण्यात आलेला नसल्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत तलाठी यांना निवेदन देण्यात आले असूनही कारवाई न झाल्याकारणाने सुरुवात करण्यात आली आहे.फाऊंडेशनचे राज्य कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कचरू तोडमल (रा. नेवासा बु.) यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आबा सोपान डौले (रा. डॉले वस्ती, नेवासा बु.) यांच्या घराशेजारी अंदाजे ५० ते ६० टेलर वाळू जप्त करण्यात आली होती.

या वाळूचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत करण्यात आला आहे.इतर ठिकाणी करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार संबंधित वाळू घरकुल धारकांना वितरित करण्यात आली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डॉले वस्ती येथील जप्त वाळू स्टॉकही तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा किंवा तहसील कार्यालयामार्फत उचलून नेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात इतर ठिकाणांप्रमाणेच संबंधितांवर समान कारवाई करावी, अशा मागण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

