नेवासा – नेवासे बुद्रुक येथील प्रवरा नदी पात्रात वाळूतस्कांरावर नेवासे नगर प्रांतधिकारी सुधिर पाटील यांना अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या आदेशानुसार नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूतस्कांरावर धडक कारवाई करण्याचा आदेश मिळताच प्रांताधिकारी पाटील यांनी प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे महसूल कर्मचारी ताफा सोबत घेत सर्च ऑपरेशन राबवून दि.११ दुपारी ४वाजलेपासून दि.१२मध्यरात्री १ वाजेपर्यंत धडक कारवाई सुरू ठेवून वाळूतस्कांरांचे कंबरडे मोडून जवळपास २८ लाखांचे ७० तराफे व इतर साहित्य भस्मसात केले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. काल, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत नेवासा प्रवरा नदी पात्रात अंदाजीत किंमत: एका तराफ्याची अंदाजे किंमत ४०,००० रुपये असून, या कारवाईत एकूण सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

विशेष मदतीसाठी नदीपात्रातील कारवाईसाठी श्रीरामपूर येथून खास बोट व विशेष पथक पाचारण करण्यात आले होते, ज्यांची या मोहिमेत महत्त्वपूर्ण मदत झाली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे, महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.

कारवाई सुरू आसताना गावातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला मदतीसाठी जेसीबी ट्रॅक्टरची गरज होती. कुठलेच सहकार्य न करता लांब राहणे पसंत केले. यावेळी प्रांताधिकारी पाटील यांनी खंत व्यक्त करून वाळूतस्कांराची असलेली दहशत दिसून आली.
मागील आठ महिन्यांपूर्वी गोदावरी नदी पात्रातील वाळू उपसाला जैनपूर,घोगरगांव येथील ग्रामस्थांनी विरोध केला असता वाळूतस्कांराकडून हाणमार करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने लक्ष घालून वाळूतस्कांरावर कारवाई करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी वेळोवेळी वाळूतस्कांरावर कारवाया करत असून वाढता राजकिय हस्तक्षेपामुळे वाळूतस्करी फोफावली असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. नेवासे शहरात तालुक्यात वाळूतस्कांरावर झालेल्या कारवाईने प्रांताधिकारी पाटील, प्रभारी तहसीलदार घोरपडे महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अभिनंदन होतं आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अशा घटकांवर यापुढेही प्रशासनाची करडी नजर असून कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील- प्रांताधिकारी सुधिर पाटील.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

