घोडेगाव— घोडेगाव येथे दि. १२ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात पाच जणांसह तिन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिल नितीन विलास शिरसाठ रा. वांजोळी यांचे कडे घोडेगाव बाजाराचा ठेका त्यांचा भाऊ निलेश शिरसाठ व आज रोजीआनंद लोंढे चे नावावर घेतला आहे. सदरचा ठेका हा आरोपी कृष्णा यल्लप्पा फुलमाळी व भारत यल्लप्पा फुलमाळी यांच्या कडे होता. सदरचा ठेका यातील मयत नितीन शिरसाठ याने स्वतः कडे घेतल्याने आरोपी मयत यांच्या वर चिडून होते. त्यांनी मयताच्या सासऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी मयत यांनी तो ठेका सोडून द्यावा म्हणून धमकी दिली होती. अशातच दि. १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील घोडेश्वरी हाॅस्पीटल मध्ये आरोपी गुलाब सादिक फुलमाळी व सुरज फुलमाळी यांनी कृष्णा व भारत फुलमाळी यांच्या सांगण्यावरुन नितीन शिरसाठ यांना गावठी कट्यातुन गोळीबार करून जिवे ठार मारले. तसेच तीन अनोळखी व्यक्तींनी सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपीस मदत केली आहे.

या तील सुरज फुलमाळी यास गुलाब फुलमाळी याच्या हातातील पिस्तोलाने तो जखमी झाला. दि. १३ रोजी सोनई पोलीस ठाण्यात मयत यांची पत्नी स्वाती नितीन शिरसाठ (वय.३०) यांनी आरोपी गुलाब सादिक फुलमाळी, सुरज यल्लप्पा फुलमाळी, आकाश आण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लप्पा फुलमाळी, भारत यल्लप्पा फुलमाळी, सर्व राहणार घोडेगाव व तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुन्हा र. नं. ५०/२०२६ बिएन एस चे कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आर्म अॅक्ट ३/२५, ३/२७ अ. जा. ज. प्र. का. कलम ३(II), (v) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास निरज राजगुरू पोलीस उप विभागीय अधिकारी शेवगाव हे करत आहेत. शुक्रवार येथील बाजार दिवस असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. शुक्रवारी दुपारी फाॅरेन्सिक एक्सपर्ट यांना घटना स्थळी पाचारण करण्यात आले होते. आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

