विज वितरण
विज वितरण

नेवासा – विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना अरेरावी करून , सरकारी कामात अडथळा आणणार्या आरोपीस मा.सत्र न्यायाधिश श्री.एस.एस.देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची व रक्कम रूपये ५०००/- ची शिक्षा सुनावली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दि.०५/१०/२०१५ रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या वसुली व वीज बिल न भरल्यास विज कनेक्शन कट करणारे पथकातील कर्मचारी सुभेदार वस्ती, वाॅर्ड नं.२, श्रीरामपुर येथे विज ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी गेले असता, त्यांनी व त्यांचा मुलगा गणेश रूपचंद गांगुर्डे व पत्नी बबीता गांगुर्डे यांनी लाईट बिल भरणार नाही काय करायचे ते करा असे म्हणुन पथकातील कर्मचारी यांना शिवीगाळ केली व पथका तील विद्युत सहाय्यक फारूक तडवी हे पोलवर कनेक्शन कट करण्यासाठी चढायला लागले असता, त्यांना आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याने लाकडी दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित कर्मचारी यांनी सदर बाब वरिष्ठांना कळविली असता म.रा.वि.वि.कंपनीचे अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ गोरे हे घटनास्थळी आले.

विज वितरण

त्यांनी आरोपींना समजुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने त्यांची गचांडी धरून धक्का बुक्की केली.त्यामुळे अभियंता गोरे यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन आरोपींविरुध्द फिर्याद दाखल केली.पोलीस स्टेशनने त्यावरून गु.र.न.२८४/२०१५ भा.द.वि.क.३५३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला.
त्यावरून पो.हे.कॉ.हबीब यांनी तपास करून दोषारोपपत्र मा.न्यायालयत दाखल केले.

विज वितरण

सदर गुन्ह्याची चौकशी होवुन,सरकारपक्षाने एकून ८ साक्षीदार तपासले .सरकार पक्षाचा युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून मा.न्यायालयाने आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे यास ०२ महिने सश्रम कारावास व रक्कम रूपये ५०००/- इतके द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री मयुरेश नवले यांनी काम पाहिले .त्यांना सरकारी अभियोक्ता श्री प्रसन्न गटणे यांनी सहकार्य केले तसेच पो.उ.नि.घाणे व पो.कॉं. ठोंबरे यांनी सहकार्य केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विज वितरण
विज वितरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विज वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!