लव्ह जिहाद

नेवासा- राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल ०५ दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परिसरातील चर्चेत या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा विषय असल्याचे सांगितले जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे.या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राहुरी पोलिसांनी कारवाई करत नाशिक-सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे.मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही.

लव्ह जिहाद

पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं.
या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण , आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता.

लव्ह जिहाद
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लव्ह जिहाद
लव्ह जिहाद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लव्ह जिहाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!