पुणे जिल्ह्यातील महिलेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद
नेवासा-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयित अभिषेक कळमकर याचा शोध याबाबत पुणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी पहाटे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. सोशल मीडियावरून तिने अभिषेक कळमकर याचा मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीसंदर्भात संपर्क साधला. अभिषेकने तिला कुष्ठधाम रोड परिसरात बोलावून शिक्षणाची चौकशी केली आणि नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर काही दिवसांनीअभिषेकने एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगून शाळा दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. दुसऱ्या दिवशी महिला अहिल्यानगर येथे आल्यानंतर अभिषेकने तिला केडगाव बाह्यवळण रस्त्यावर उतरायला सांगितले. तेथून काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेला. वाहनात असताना तिला शीतपेय दिल्यानंतर गुंगी आल्यासारखे झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर सुमसाम ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे.

महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिने तत्काळ कोणालाही माहिती दिली नाही. मात्र १८ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिषेकने व्हॉट्सअॅप कॉल करून तिला शिरूर (जि. पुणे) येथील मारवेल हॉटेल येथे बोलावले. हॉटेलच्या रूम क्रमांक ११० मध्ये बोलावून दरवाजा बंद करून नोकरीची चिंता करू नकोस, सर्व खर्च पुरवेल, असे सांगत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा विरोध असतानाही जबरदस्तीने अत्त्याचार केल्याचा आरोप. आहे. तसेच या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून संबंधाबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ करीत आहेत. पोलीस अभिषेकचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

