निधी

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून प्रलंबित

नेवासा राज्यात गतवर्षी झालेली अतिवृष्टी, महापुरात शेती, पशुधन आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होता. या नुकसानीपोटी राज्य सरकारने – केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) २९ हजार ७८१.६६ कोटी रुपयांची मदत मागितली आहे. हा प्रस्ताव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आला होता. अद्यापपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

मदत आणि पुनर्वसन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि महापुराचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. पिकांचे नुकसान, जमीन खरवडून जाणे, पिके पाण्याखाली जाऊन कुजणे. पशूधनाचा मृत्यू आदी घटनांमध्ये शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्या खालोखाल पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले होते.

Kavya

राज्य सरकारने ० ते २ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीसाठी ८ हजार ८१२.१० कोटी. २ ते ३ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीसाठी ८४८.१७ कोटी. शेत जमिनीच्या नुकसानीसाठी १९३.०९ कोटी. बियाणे आणि खतांच्या नुकसानीसाठी ९ हजार ६११.१७ कोटी. पशुधनाच्या नुकसानीसाठी २६.२० कोटी. मत्स्य विभागाच्या नुकसानीसाठी ८७.८३ कोटी. वैयक्तिक घरांच्या नुकसानीसाठी ३९.६६ कोटी आणि उणे प्राधिकारणातून जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीसाठी १६३.१७ कोटी, शेती आणि शेती संलग्न बाबींसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एकूण सुमारे १९ हजार ७८१.३९ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

निधी

अतिवृष्टी आणि महापुरात रस्ते, पूल, शाळा, सार्वजनिक इमारतींचेही मोठे नुकसान झाले. पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व पूल दुरुस्तीसाठी ४,०६६.९८ कोटी. ग्रामीण विकास विभागासाठी ४,५८५.७० कोटी. जलपुरवठा व स्वच्छता विभागासाठी ८०.८६ कोटी. ऊर्जा विभागासाठी २६०.९६ कोटी. शालेय शिक्षण विभागासाठी १४६.५० कोटी. सामुदायिक इमारतींसाठी ५०२.६४ कोटी. सिंचन विभागासाठी ३५०.३४ कोटी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी ६.२९ कोटी रुपये, अशी एकूण १० हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने तातडीने मदत दिली

गतवर्षी अतिवृष्टी, महापुरात झालेल्या नुकसानीपोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदतीची प्रस्ताव केंद्र सरकारकडे डिसेंबर महिन्यात पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू असून, केंद्राकडून मदत मिळेल. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधितांना तातडीने मदत केली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.

निधी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निधी
निधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!