‘गुप्तधन, अघोरी विधी की गुन्हेगारी कट ? ‘गावात भीतीचे वातावरण
नेवासा : तालुक्यातील संत किसनगिरी बाबांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने गोधेगाव येथे एका निर्जन वाड्यात १० ते १५ फूट खोल भुयार खोदलेले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या खोदकामामागे कथित ‘गुप्तधन’ शोध, अंधश्रद्धेतून केलेले अघोरी विधी की एखादा गुन्हेगारी स्पष्टता नसली तरी नागरिकांमध्ये कटयाबाबत अद्याप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी शेंदूर लावलेला दगड, हळद-कुंकू, अगरबत्ती व इतर पूजेचे साहित्य आढळून आले आहे. या साहित्याचा भुयाराशी नेमका काय संबंध आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी काही नागरिकांनी येथे ‘अघोरी विधी’ झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, एका जागरूक नागरिकाने संशयित हालचालींबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, “तू यात पडू नको, नाहीतर तुला महागात पडेल,” अशी धमकी मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

दरम्यान, संत किसनगिरी बाबांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात घडलेल्या घटनेने श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कायदा-सुव्यवस्था यांवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, तपासातून सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
वाड्यात १० ते १५ फूट खोल भुयार खोदण्यासाठी मोठा कालावधी लागला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती किती दिवसांपासून येथे सक्रिय होत्या, हा प्रकार केवळ अंधश्रद्धेतून घडला की नशेत धुंद असलेल्या टोळीची ही विकृतीयाबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही मात्र ‘बळी’ देण्याच्या चर्चेमुळे गावातील पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर दोन संशयित फरार झाले आहेत. फरारांची ओळख व पार्श्वभूमी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जुने गोधेगाव येथील प्रकाराची माहिती मिळताच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. फरार झालेल्या इतर दोघांचा शोध सुरू असून खोदकामाचा उद्देश आणि या प्रकारामागील पार्श्वभूमीचा सखोल तपास केला जात आहे. खरा प्रकार तपासानंतरच उघड होईल.
– महेश पाटील, पोलीस निरीक्षक, नेवासा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

