उपोषण

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथे बेलापूर- परळी रेल्वेमार्गासाठी सुरू असलेले उपोषण १३ व्या दिवशी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व रेल्वेचे कार्यकारी अभियंता राजनारायण यांच्या मध्यस्थीने लिंबू पाणी पिऊन उपोषण स्थगित करण्यात आले.

बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने रितेश भंडारी, रज्जाक इनामदार व सुरेश नरवणे यांनी दि.९ फेब्रुवारीपासून कुकाणा येथे उपोषण सुरू केले होते. आ. विठ्ठलराव लंघे यांनी उपोपणाला भेट देऊन परळी रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपोषणकत्यांची भेट घेत उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दूरध्वनीवरून संवाद साधून उपोपणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले, परंतु मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम राहिले.

Kavya

उपोषणकर्त्यांना अशक्तणा व चक्कर येत असल्याने दि. १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिथे ही उपोपण सुरूच ठेवले होते. उपचारानंतर दि. २० रोजी रात्री उपोषणकर्ते पुन्हा कुकाणा येथील उपोपणस्थळी परतले व उपोषण सुरूच ठेवले. दि. २१ फेब्रुवारी या उपोपणाच्या १३ व्या दिवशी सायंकाळी पाच वाजता खा. भाऊसाहेब वाकचौरे रेल्वेचे कार्यकारी अभियंता राजनारायण यांनी उपोपणस्थळी त
भेट देऊन उपोषणकत्यांशी चर्चा केली. यावेळी परळी रेल्वे मार्गासाठी पुन्हा सर्वेक्षण न करता हा मार्ग मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन
दिल्याने उपोपणकत्यांनी खासदार वाकचौरे व राजनारायण यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण स्थगित केले.

उपोषण

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भैय्यासाहेब देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, नेवासा शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, पंकज लंबाटे, अभिजीत लुनिया, एकनाथ कावरे भाऊसाहेब सावंत, दौलतराव देशमुख, प्रकाश देशमुख, मच्छिंद्र आरले, भाऊसाहेब सावंत, अण्णासाहेब गव्हाणे, मुकुंद अभंग यांच्यासह कुकाणा पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online
उपोषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!