रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

सोनई : मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन विषय हाताळून उत्स्फूर्तरीत्या केलेल्या सादरीकरणाचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी कार्यक्रमप्रसंगी कौतुक केले.

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

गेल्या कित्येक वर्षापासून मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई येथे यश ग्रुप च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व डी. फार्मेसी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर अँड मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच संशोधनवृत्तीला चालना मिळावी या करिता मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत घुले यांनी नेहमीच संधी उपलब्ध करून दिली.या स्पर्धेकरिता यश ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत असलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र तसेच पॉलिटेक्निक मधील 90 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिंदे आरती व मोहिते विशाल, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कदम अक्षदा व नगरे मयुरी, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक लोडगे प्राजक्ता, बोखरे ऐशा व गांधी नूतन तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कनगरे दिव्या व कदम वैष्णवी यांना मिळाले.

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राऊत वैष्णवी व परभणे तनुजा, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटारे वैष्णवी व पारे अक्षदा, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सावंत मिताली व वालतुरे प्रतीक्षा, उत्तेजनार्थ पारितोषिक वाघ साक्षी व म्हसरूप शाम यांना मिळाले.

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

विद्यार्थ्यांनी नेहमीच संशोधनामध्ये व्यस्त राहून आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य प्रशांत घुले यांनी केले.

स्पर्धेचे मूल्यांकनाचे काम मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी, सोनई येथील सहाय्यक प्राध्यापक स्वप्नील फिरोदिया व सहाय्यक प्राध्यापक सोनाली गाडे यांनी केले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा परभणे व आभार प्रदर्शन प्रा. संकेत जंगले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!