नेवासा- नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील साहील कैलास मोटे यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे.
याबाबत साहील कैलास मौटे (वयं २९) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, १९ फेब्रुवारी रोजी चुलतभाऊ करण संदीप मोटे याचा हळदीचा कार्यक्रम राहुरी येथे होता. त्यामुळे मी व माझे कुटुंबीय दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराला व्यवस्थित कुलूप लावून गेलो होतो. त्यानंतर रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून मी व कुटुंबीय परत घरी आलो.

त्यावेळी आमच्या घराजवळून ३ ते ४ इसम अंधारात पळालेले दिसले. आम्ही घरी जाऊन पाहिले असता, घराचा कडी-कोयंडा उचकटलेला व दरवाजा उघडा दिसला. तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात ठेवलेली सुमारे ४ लाख रुपये रोख रक्कम चौरून नेली आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) व ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

