
कृषि विज्ञान – कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर जागतिक परिषद मुंबई येथे सुरू आहे जागतिक परिषद 2026 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी तयार केलेल्या ॲपचे अनावरण करण्यात आले या ॲपमुळे रोग आणि किडींची विविध पिकावर ओळख करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होईल.

तसेच फोटो वरून कीड आणि रोगाचे निदान झाल्यानंतर पिकावर तंतोतंत व योग्य औषधाची फवारणी करता येईल कीड व रोगाचे निर्मूलन अचूकतेने केल्यामुळे कीटकनाशकावरील खर्च निश्चितपणे कमी होईल महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कुलगुरू सन्माननीय डॉक्टर विलासराव खर्चे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदरचे ॲप तयार करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टर खर्चे यांचे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

