बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

नेवासा – बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, भानसहिवरे येथील जय मल्हार हाऊस, मध्ये राहणारा व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारा इयत्ता ६ वी मधील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,सार्थक विक्रम कोकरे वय १२ रा.पाचोंदा ता.नेवासा याने दि.२४-०२-२०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉस्टेलच्या बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

सूरज रतीकांत भणगे वय 23 वर्षे,हर्षल बाळासाहेब शिंदे वय 24 वर्षे दोन्ही विद्यार्थी हे ग्राउंडवर जेवण करीत असताना तेथे दोन लहान मुले आली व त्यांनी एका विद्यार्थ्याने बाथरूम मध्ये फाशी घेतली आहे असे सांगून रडू लागली म्हणून वरिल नमूद दोन्ही विद्यार्थ्यांनी बाथरूम मध्ये जाऊन गळफास घेतलेल्या मुलास सोडवले सदरवेळी सुनील नानसिंग गावित, (शिपाई) राहणार स्टाफ क्वार्टर यांनी मदत केली तात्काळ शिक्षक काकासाहेब वाल्हेकर व अमोल विघे यांनी विद्यार्थ्याला शाळेतून ऍम्ब्युलन्सने नेवासा फाटा येथील आत्मदीप हॉस्पिटल येथे नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच विद्यार्थी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा या ठिकाणी विद्यार्थ्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यूचे कारण गळफास घेऊन मृत्यू असे सांगितले आहे. विद्यालयाचे व होस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे पाहणी केली असता प्रथमदर्शनी काहीही आक्षेपार्ह दिसून आलेले नाही. तसेच विद्यार्थी राहत असलेले ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह चिट्ठी मिळून आली नाही.

बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक ससाणे यांनी भेट दिली आहे. बालकाच्या मृत्यूच्या कारणांबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!