गावठी कट्या
गावठी

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.

गावठी

सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल द्वारके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, किशोर शिरसाठ, यांचे पथक
दि. २५ रोजी हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीच्या आधारे प्रदिप जगधने रा.वडाळा बहीरोबा ता.नेवासा हा वडाळा बहीरोबा गावात कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली.

गावठी

त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी हॉटेल संदिपच्या पाठीमागे सापळा लावला असता एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नांव प्रदिप मोहन जगधने वय- २१ वर्षे रा. वडाळा बहिरोबा ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे सांगीतले. ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन ३०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गावठी

सदर आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काॅस्टेबल किशोर शिरसाठ यांनी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ७२/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर हे करत आहेत.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

गावठी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गावठी
गावठी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गावठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!