महाराजस्व

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानासंदर्भात नगरपंचायतीमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले होते. महसूल अंतर्गत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे घुले यांनी सांगितले. मंडलाधिकारी अनिल गव्हाणे यांनी स्वागत केले. महसूल अधिकारी फिरोज सय्यद यांनी अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. घुले म्हणाले, की महसूल अंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ही एक पर्वणी आहे.

महाराजस्व

या अभियानाच्या माध्यमातून योग्य नियोजन करून प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी महसूल विभाग व नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. भोगवटादारांना हक्काचे उतारे कसे देता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून, जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन महसूल अधिकाऱ्यांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक प्रवीण सरोदे, ग्राम महसूल अधिकारी पल्लवी पवार, महसूल अधिकारी रुचिता कडाळी, सुधीर चव्हाण, दीपक चौधरी, विष्णू शिर्के, बाळासाहेब चौधरी, अरुण जाधव, नीलिमा वाबळे, देविदास शिंदे, अमोल साळवे, राहुल चव्हाण, सागर पवार आदी यावेळी उपस्थित होते.

महाराजस्व
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराजस्व
महाराजस्व

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराजस्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!