आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
श्रावणबाळ

नेवासा-केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजनांतील पात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान सध्या तांत्रिक अडचणींमुळे रखडल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

पूर्वी या योजनांचे अनुदान ऑफलाइन पद्धतीने वितरित केले जात होते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाने डीबीटी प्रणालीद्वारे, म्हणजेच आधार-आधारित थेट खात्यात जमा करण्याची पद्धत अवलंबली आहे. पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे बहुतांश लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे आमदार लंघे यांनी निदर्शनास आणून दिले.

श्रावणबाळ

विधानसभेत बोलताना ते म्हणाले, या योजनांतील अनेक लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ पासून आजपर्यंत अनुदान मिळालेले नाही. शासनाने पूर्वीचे १५०० रुपयांचे अनुदान वाढवून २५०० रुपये केल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले; परंतु प्रत्यक्षात पोर्टलवर नोंदणी नसणे किंवा केवायसी प्रक्रियेत अडथळे येणे यामुळे लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभही मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विविध कारणांमुळे अनेक जण केवायसी पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी डिसेंबर २०२४ पासून अनुदान न मिळाल्याने काहींवर उपासमारीची वेळ आल्याची परिस्थिती त्यांनी सभागृहासमोर मांडली. डीबीटी प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ शोधून त्यांचे निराकरण होईपर्यंत संबंधित पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार लंघे यांनी विधानसभेत केली.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रावणबाळ
श्रावणबाळ
श्रावणबाळ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रावणबाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!