घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे तिथीप्रमाणे दि. ६ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी गावातील ५०ते ६० तरुणांनी गड किल्ले शिवनेरी येथुन पायी ज्योत आणली होती.ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.जिल्हा परिषदेचे सुनीलभाऊ गडाख तसेच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पायी ज्योत आणलेल्या तरुणांचा सन्मान देखील या वेळी करण्यात आला.

सायंकाळी ७ ते ९ शिवचरित्रकार ह . भ. प नितीनजी महाराज भोसले यांच्या सुमधुर वाणीतून किर्तन सोहळा पार पडला. तदनंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे सुनीलभाऊ गडाख, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, निवृत्ती महाराज लांडे, अशोक महाराज नरवडे, सरपंच कैलासराव दरंदले, सेवा निवृत्त कृषी अधिकारी नारायण दहिफळे, पोलीस पाटील संजय दहिफळे, तंटामुक्ती चे अध्यक्ष विठ्ठलराव बडे, छत्रपती ग्रुप गणेशवाडी, सतोबावाडी, विठ्ठलवाडी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

