सोनई (वार्ताहर) – राहुरी- शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या २१.८४ किमी च्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याने जमीन जात असलेल्या शेतकरी वर्गाची झोप उडाली आहे.
गुरुवार दिनांक पाच रोजी रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात राजपत्र प्रसिद्ध करून अधिसूचना जारी केल्याचे समजल्याने अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे एक तर शेतकरयांना जमीन कमी व त्यात जर बागायती जमीन गेली तर अनेकांचे जगणं मुश्किल होणार आहे.शिंगणापूर सोनई या दोन गावांच्या रेल्वे मार्ग जात असलेल्या शेतकऱ्यांचे नावे गट नंबर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे ही सर्व जमीन बागायती स्वरूपाची आहे

या जमिनीवर शेतकऱ्यांचे कुटुंब पूर्णतः अवलंबून आहे अचानक विकासाच्या नावाखाली ही जमीन जाणार असणारे शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. जमीन,घर, विहीर, जनावरांचे गोठे, शेतातील प्रकल्प गेले तर त्याची भरपाई मिळेल की नाही? याही विचारात शेतकरी आहे.
अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला असून त्या संदर्भातील कुणाचे आक्षेप असतील त्यांना ते नोंदविण्यास मुदत देण्यात आली असून पुढील काही दिवसात हे शेतकरी हरकती घेणार असून आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे समजते.

राहुरी – शिंगणापूर या मार्गाचे पांढरीपुल मार्गे सर्वेक्षण झाले होते या मार्गात जास्त जिरायत क्षेत्र असल्याने या मार्गाने झाल्यास बागायती क्षेत्र अबाधित राहील व
शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्र जर सरकारला जोडायचेच असेल तर संभाजीनगर ,अहिल्यानगर ,सुपा व पुणे असा नवीन मार्ग झाल्यास त्याचा फायदा वाळुंज पंढरपुर एमआयडीसी, पांढरीपुल, एमआयडीसी अहिल्यानगर, सुपा एमआयडीसी यासह देवगड देवस्थान नेवासा देवस्थान, शनिशिंगणापूर देवस्थान, रांजणगाव महागणपतीला येणाऱ्या भाविकांसह उद्योग क्षेत्र वाढीस पुरक होईल असे भाऊसाहेब निमसे यांनी मत व्यक्त केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

