आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कर्जमाफी
कर्जमाफी

सोनई – सध्या राज्यात कर्जमाफी संदर्भात लगभग सुरू आहे या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कामगाराना लाभ मिळावा म्हणून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे सरचिटणीस राऊ शंकर पाटील यांच्या शिष्टमंडळानी पुणे येथे भेट घेऊन गाऱ्हाणे मांडून निवेदन दिले आहे. राज्यशासनाच्या कर्जमाफी धोरणाच्या प्रश्वभूमीवर शासन पातळीवर साखर कारखानाच्या साखर कामगार, पदाधिकारी यांची माहिती मागवली असून त्यांचा पूर्ण अभ्यास करून कर्जमाफीचा लाभ मिळावा, त्यांना शासनाने वगळू नये, जर याविरुध्द निर्णय घेतल्यास आंदोलनाचा वेगळा विचार केला जाईल, असा इशारा साखर कामगार राज्य संघटनेने दिला आहे.

नुकतीच पुणे येथे पूणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे शिष्ट मंडळांने भेट घेतली त्यावेळी विविध कामगार समस्या बाबद आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम.निमसे, युवराज रणवरे, प्रदीप शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे,सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, सयाजी कदम तसेच मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रा मध्ये साखर उद्योगात सहकारी खाजगी व भाडेतत्त्वावर साखर कारखाने चालतात या सर्व साखर कारखान्यामध्ये कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाही शासनामार्फत शेतकऱ्याची जी कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये साखर कामगार व इतर सहकारी संस्थेतील संचालक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी,यांची माहिती मागितली जात आहे.

कर्जमाफी

आज संपूर्ण राज्यात साखर कामगार ७०ते८० टक्के हंगामी कामगार आहे, त्यामुळे हा कामगार तीन ते चार महिनेच कामावर आसतो इतर दिवशी कारखाना चालू होईपर्यंत घरी असतो त्यामुळे आपण साखर कामगारास कामगार सज्ञेतून वगळून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, तसें निवेदन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे.

कर्जमाफी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कर्जमाफी
कर्जमाफी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कर्जमाफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!