लंघे

नेवासा राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. सहलीसाठी नव्या कोऱ्या बस गाड्या देऊनही चालकांना सलग दोन दिवस कामावर पाठवून पुन्हा परत या बसचालकांना सहलीच्या दौऱ्यावर पाठविले असल्यामुळेच पहाटेच्या वेळी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नसली तरी यावर मात्र उपाययोजना करण्याची मागणी आ. लंघे यांनी विधानसभेच्या सभागृहात केली.

लंघे

नेवासे मतदारसंघातील पिंप्री शहाली या जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल ही शिवनेरी किल्ल्यावर जात असताना अहिल्यानगर – कल्याण महामार्गावरील खामुंडी (जुन्नर) गावाजवळ ५७ विद्यार्थी घेऊन जात असलेल्या बसचा पहाटे अपघात झाला होता. चालकाने सलग दोन दिवस काम केलेले असतानाही त्याला या सहलीसाठी पाठविण्यात आल्यामुळे पहाटेच्या वेळी ही बस पलटी होऊन हा अपघात झाला. अपघातात १३ विद्यार्थी व ५ शिक्षक जखमी झाले होते. त्यामुळे या शैक्षणिक सहलींसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसची योग्यता, चालकाची तपासणी आणि नियमांचे कडक पालन करण्यावर अधिक भर देण्याची मागणी आ. लंघे पाटील यांनी केली.

लंघे

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक सहलींमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याबाबत आ. लंघे यांनी थेट या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवून यामध्ये सुधारणा करण्याची मागणी सभागृहात केली. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेला प्रथम प्राधान्य देणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीला सुस्थितीत असलेल्या चांगल्या बसेस व सक्षम चालक आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाला आवश्यक ‘त्या’ सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.

लंघे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!