घोडेगाव – मुळा उजवा कालवा धनगरवाडी शिवारात शेती पंपाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १८ रोजी मध्यरात्री ते १९ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान धनगरवाडी गावच्या शिवारात मुळा उजवा कॅनलवर बसवलेल दहा हजार रुपये किंमतीची दहा एच पी चा शेती कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला असल्याची फिर्याद किरण संजय घावटे (वय.३२) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा र. नं. ९३/२०२६ बिएन एस चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस इन्पेक्टर काकासाहेब राख हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






