आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पैसे

अनेकांना लावला चुना! अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे वसुली!

नेवासे – महसूल व पुनर्वसन विभागात माझा दांडगा जनसंपर्क आणि ओळख आहे,’तुमचे काम मी मार्गी लावून देतो’? पण अधिकाऱ्यांना मात्र पैसे द्यावे लागतील? असे म्हणून चक्क अधिकाऱ्यांच्याच नावावर पैसे घेवून काम करून देण्याचे आश्वासन देत नेवासे फाटा येथील एका कथाकथित ठक बहादराने नेवासे तालुक्यातील अनेकांना चांगलाच चुना लावलेला असून अनेकांची कामे करून देण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या नावावरच पैसे घेवून फसवणूक करणार हा अवलिया कोन? याची खुमासदार सध्या नेवासे फाटा आणि परिसरात चांगलीच रंगली जात आहे


नेवासे तालुक्यातील काही बागायतदार आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची महसूल दप्तरी त्यांच्या सातबारा उत्तऱ्यामध्ये झालेला घोळ किंवा दुरुस्ती करण्यासाठी तालुक्यातील काही निराक्षर आडाणी पण पैशेवाल्या लोकांना विश्वासात घेवून तुमचा घोळ मी निपटून देतो पण आधी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील? असे सांगून हा ठक बहाद्दर काही अडल्यानडलेल्या लोकांना थेट त्याच्याच चार चाकी गाडीत घेऊन जाऊन सरकारी कार्यालय समोर आल्यानंतर त्याची गाडी थांबवून हा चलाख ठक बहाद्दर बरोबर आणलेल्या लोकांना तुम्ही गाडीतच बसून रहा, मी अधिकाऱ्यांना पैसे देवून आलोच? असे म्हणून अनेकांची फसवणूक करणाऱ्या या अवलियाने दरमहा अनेकांना टोपी घालून चुना लावलेला असून नंतर त्याला जर कोणी आपल्या कामाचे काय झाले? अशी विचारणा करण्यासाठी फोन केला? तर त्यांचे फोनही हा अवलिया घेत नसून अनेकांना अधिकाऱ्यांनाच पैसे द्यावे लागतील? असे सांगून पैसे उकळणाऱ्या हा ठक बहाद्दर अनेकांच्या रडारवर आलेला असून कोन कधी या अवलियाची पोलीस ठाण्यात फिर्याद देईल? याचा मात्र आता नेम राहिलेला नसून थोड्याच दिवसात या अवलियाच्या मुसक्या पोलीस आवळणार असल्याची सुकृत दर्शनीय चिन्हे निर्माण झालेली आहेत.

महसूल आणि पुनर्वसन विभागात अडल्या नडलेल्या काही लोकांचे काम करून देण्यासाठी चक्क अधिकाऱ्यांच्याच नावाखाली पैसे घेवून त्यांच्याच नावाची बदनामी करणाऱ्या या अवलियाला नेमका कोणाचा आशीर्वाद लाभला? कवडीचे काम न करता लोंकाची फसवणूक करणाऱ्या या अवलियाची फसवणूक झालेले काही लोक लवकरच त्याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून ज्यांची फसवणूक झाली? त्यांना हा ठक बहाद्दर आता पैसे माघारी देण्याचे आश्वासन देवून आजची फाशी उद्यावर घेवून जात असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहे त्यामुळे या अवलियाचे कारनामे लवकरच समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पैसे
पैसे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पैसे
पैसे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!