
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद येथे जत्रेत नाचताना धक्का लागल्याने युवकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २३ रोजी फिर्यादी सुनील ज्ञानदेव बर्डे रा. शिरेगाव हे खेडलेपरमानंद येथील मारुती मंदिरासमोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी आर्यन बर्डे, शुभम बर्डे, आदित्य वैरागर सर्व राहणार खेडलेपरमानंद हे त्या ठिकाणी आले व तु काल मला नाचताना धक्का का दिला असे म्हणत शिवीगाळ केली तसेच लोखंडी गज व स्टीलचे कड्याने, लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तु जर परत आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
त्या नुसार आरोपींविरोधात गुन्हा र. नं. ९६/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अंकुश दहिफळे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






