घोडेगाव – सोनई येथील वंदना बापु फुलमाळी (वय.२६) रा. दरंदले गल्ली सोनई या आपल्या सासरी नांदत असताना तिचा पती बापू कान्हु फुलमाळी याने तिला वेळोवेळी लाथाबुक्यांनी मारहाण करुन व दमदाटी करत तिचा दिर वसंत कान्हु फुलमाळी रा. शंकरनगर पाथर्डी यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी तुझ्या माहेरून सहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला.

दि. २३ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये पिडीत महिलेने म्हटले आहे. त्यानुसार बापू कान्हु फुलमाळी रा. सोनई तसेच वसंत कान्हु फुलमाळी रा. शंकर नगर पाथर्डी यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. ९७/२०२६ बिएन एस चे कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) (३), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






