सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापूर येथील कायम कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्या मध्यस्थीने मागे घेतले.
प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत संवादाचा मार्ग स्वीकारला गेल्याने तोडगा निघण्याच्या शक्यता अधिक बळकट झाल्या आहेत. दि. ३० मार्चपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. वेतनातील विलंब, सेवा अटींमधील अनिश्चितता तसेच कंत्राटी पद्धतीतील त्रुटी या मुद्यांवर कर्मचारी आक्रमक झाले. दि. २९ मार्च रोजी त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे न्यायाची मागणी केली होती.

निवेदनाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने तातडीने हस्तक्षेप करत देवस्थान प्रशासनाला चर्चेचे निर्देश दिले. त्यानुसार, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत देवस्थान प्रशासनाचे प्रतिनिधी, संबंधित कंत्राटदार तसेच कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, सर्वांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. निर्णयक्षम प्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






