माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते उद्घाटन; पारितोषिकांसह क्रीडारसिकांना पर्वणी
यशवंत स्पोर्ट्स क्लब सोनई व माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई येथे दि. 4 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिवसा तसेच रात्री खेळवली जाणार असून परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. राज्यभरातून सुमारे 50 शूटिंग हॉलीबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, अनेक राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंचा सहभागही यामध्ये अपेक्षित आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, द्वितीय 15 हजार, तृतीय 11 हजार, चतुर्थ 7 हजार तर पाचवे ते आठवे क्रमांकासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट शूटर, बेस्ट डिफेन्सर आणि बेस्ट पंचर अशी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान केली जाणार आहेत.
प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







