आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कबड्डी

नेवासा- तेलकुडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये त्रिमूर्ती कबड्डी अकॅडमीच्यावतीने १ ते ३० एप्रिल रोजी होणाऱ्या कबड्डी सराव प्रशिक्षण शिबीर आणि जिमचे उद्घाटन बजरंगबली प्रतिमा व मैदान पूजन करून मेजर सर्जेराव घाणमोडे आणि मेजर हरिभाऊ पाठे यांच्याहस्ते करण्यात आले.

कबड्डी

याप्रसंगी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, प्राचार्य राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोपानराव काळे उपस्थित होते. विश्वस्त चेतन चव्हाण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासकीय अधिकारी मनीषा राऊत यांनी विद्यार्थ्यांना संस्थापक स्व. मेजर साहेबराव घाडगेपाटील यांनी मैदानी खेळाला नेहमीच प्राधान्य दिल्यामुळे या राष्ट्रीय खेळात आपल्या खेळाडूंचे वर्चस्व सातत्याने पुढे असल्याचे सांगितले. सर्जे राव घाणमोडे मेजर यांनी खेळाडूंना सुदृढ समाज घडवण्यासाठी खेळांचे महत्व विषद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बडे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दुधाडे, क्रीडा शिक्षक भाऊ घाडगे, कबड्डी प्रशिक्षक विजय अनपट आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

कबड्डी
कबड्डी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कबड्डी
कबड्डी
कबड्डी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कबड्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!