नेवासा फाटा –येथील शिव महाराणा प्रताप चौकात आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
लोकनियुक्त सरपंच सतीश दादा नीपुंगे पाटील, पोलीस पाटील आदेश साठे, भारत भाऊ डोकडे (माजी नगरसेवक), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, युवा नेते सचिन परदेशी, दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाठ, माऊली वाघुले,इंगळे पाटील, अक्षय शिंदे, गणेश व्यवहारे, कृष्णा नेमाने, जालिंदर खंडागळे, अमोल साळवे, हरुण भाई शेख तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीमध्ये बादल परदेशी व कृष्णा नेमाने यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या पुढाकारामुळे युवक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी केवळ कार्यक्रमाचे नेतृत्वच केले नाही, तर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभावी प्रचार करत सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण केली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “जय ज्योतिबा!”, व समस्त महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या व“समता हवीच!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी ज्योतिबा फुले यांचे विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले ,तसेच गणेश झगरे पाटील यांनी समतेचा संदेश देऊन आपले मनोगत व्यक्त केले,व बादल परदेशी यांनी ज्योतिबा फुले यांचे विचार मांडून स्त्रीशक्तीचा जागर करणारे समाज सुधारक ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमातून सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा ठाम संदेश देण्यात आला. बादल परदेशी यांच्या नेतृत्वामुळे हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचा प्रभावी मंच ठरला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






