आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान हँड ग्रेनेड फुटले. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी दोघांची करंगळी तुटली. योग्य सूचनांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस


राज्यात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येतात. नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करायचा? पॅनिक सिच्युएशनमध्ये गोंधळून न जाता परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रात्यक्षिकं करून दाखवले जातात. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ही प्रात्यक्षिके करून दाखवली जातात. अहिल्या नगर पोलीस मुख्यालयात ही प्रात्यक्षिके सुरू असतानाच हँड ग्रेनाईड फुटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिल घेण्यात आली होती. यावेळी प्रात्यक्षिकं सुरू असतानाच हँड ग्रेनेड फुटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चौघे प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची करंगळी तुटली आहे. तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलीस

मॉक ड्रिल हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असताना हॅन्ड ग्रेनाईड हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी झाले. पोलीस मुख्यालयातच ही घटना घडली. पोलीस कर्मचारी हातात हँड ग्रेनाईड घेऊन माहिती देत होते. ही माहिती देत असतानाच अचानक हँड ग्रेनाईडचा स्फोट झाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात चारजण जखमी झाले. दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. पण दोघांची करंगळी तुटून पडली आहे.

पोलीस

आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात ग्रेनाईड होते. ते कसे फोडायचे? काय करायचे? हे काहीच आम्हाला सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली. डोळ्यात धूर गेला, असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

दुसऱ्या एका जखमी कर्मचाऱ्यानेही याची माहिती दिली. आमच्याकडे ग्रेनाईड होते. आम्हाला त्याची माहिती आम्हाला नव्हती. सूचना होत्या. पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या. या स्फोटात माझी करंगळी तुटून पडली आहे, असं या जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!