विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ साहित्यिक तथा मा खा यशवंतराव गडाख यांच्या विरंगुळा निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान प्रा. राम शिंदे यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव, सामाजिक कार्य आणि विविध विषयांवरील विचार जाणून घेतले. अनेक वर्षांच्या सार्वजनिक जीवनातून त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, त्यांच्या अनुभवांतून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन लाभल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

सभापती प्रा राम शिंदे यांचा मा खा यशवंतराव गडाख व विजयराव गडाख यांनी सत्कार केला.
या प्रसंगी उद्योजक विजयराव गडाख उपस्थित होते. तसेच गडाख कुटुंबीयांनी प्रा. राम शिंदे यांचे आत्मीयतेने स्वागत करून त्यांचा सन्मान केला. सदिच्छा भेटीमुळे विविध विषयांवर सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

फोटोओळी.
विधानपरिषदेचे सभापती प्रा
राम शिंदे यांचा विरंगुळा निवासस्थानी आहिल्यानगर येथे सत्कार
करतांना जेष्ठ मा खा साहित्यिक
यशवंतराव गडाख,विजयराव गडाख


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







