ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मनोज जरांगे

सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसतं. त्या लोकांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच असे म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांना वाचवलं आहे. त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे, त्याचे परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावे लागेल, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. तसेच, धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली, त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून धनंजय मुंडे यांनी घडवून आणला. त्यामुळे 302 मध्ये धनंजय मुंडे आरोपी होतात आणि झालाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी त्यांना आरोपी करावे, अशी मागणीही जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी केली आहे. 

मनोज जरांगे

सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसतं. त्या लोकांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच असे म्हणत आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे, कुठे खंडण्या वसूल करायच्या, हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील 1 नंबरचा आरोपी टोळी तयार करून अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचं सिद्ध झाल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटले. धनंजय मुंडेनेच मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेनीच चपला हाणायला लावला. तुम्ही असं कितीही कृती केलं तरी नियतीला मान्य नसतं. तुम्हाला याचं फळ मिळालं, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. माझ्या नादी लागू नका, इथून पुढे माझ्या नादी लागल्यास मी सोडणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी थेट आमदार धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. 

मनोज जरांगे

संतोष देशमुख यांचा खून केला हे सत्य आहे, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून हा खून केला. सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, अजित दादांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांना वाचवायला नाही पाहिजे, त्याने क्रूर हत्या घडवून आणली आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली, त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून धनंजय मुंडे यांनी घडवून आणला. त्यामुळे 302 मध्ये धनंजय मुंडे आरोपी होतात, झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ते करावे सुद्धा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. तसेच, जर धनंजय मुंडेंना आरोपी केलं नाही, तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि संतोष भैयाच्या खून खटल्याचा तपास होणार असेही त्यांनी म्हटले. 

मनोज जरांगे

धनंजय मुंडे 302 मध्ये आहे, त्याला घेतलंच पाहिजे. हे आरोपी ज्यांनी आता कबुली दिली की खून आम्ही केला, त्यांनी हेही सांगितलं असावं की धनंजय मुंडे यांच्या सांगण्याहूनच आम्ही केला. धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यालाच ते पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आहेत, रोज त्याच्याजवळ राहत होते. त्याच्या शक्तीशिवाय बळाशिवाय त्याने शक्ती दिल्याशिवाय यांच्यात ही धमक नाही. मात्र, सरकारचे काही प्रतिनिधी यात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मनोज जरांगे
मनोज जरांगे
मनोज जरांगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मनोज जरांगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!