नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुकाणा येथील बसस्टँड समोरील चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन क्रमांक MH १४ BR १४९२ यामधुन नेवासा फाट्याकडुन शेवगावकडे जात असताना तीस थांबण्याचा ईशारा करुन थांबविले असता व नमुद वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये मावा / गुटखा / सुगंधीत तंबाखु तयार करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी बारीक / कतरलेली सुपारीसह अमोल पंढरीनाथ काळे वय २८ वर्षे, रा. उस्थळ दुमाला ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा मिळुन आला असुन सदर वाहनामध्ये मिळुन आलेल्या सुपारीचे वर्णन खालीलप्रमाणे..

०१) ४,००,०००/- रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट वाहन क्रमांक MH १४ BR १४९२ अशा वर्णनाची गाडी.
०२) ४६,८००/- रुपये किंमतीचे दोन पोते त्यामध्ये मावा/गुटखा/सुगंधीत तंबाखु तयार करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी बारीक कतरलेली सुपारी अंदाजे १३० किलो प्रति किलो ३६०/- रुपये प्रमाणे..
एकुण ४,४६,८००/-
असा वरीलप्रमाणे मुद्देमाल मिळुन आलेला असुन सदरचा मुद्देमाला पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेवुन कुकाणा दुरक्षेत्र येथे ठेवण्यात आलेला असुन पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगरण्यात आलेला असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर ईसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे ठणकावुन सांगितले.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.