ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शनिशिंगणापूर

गणेशवाडी – शनि शिंगणापूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तुमची गाडी जर लटकुंनीअडवली तसेच त्यांना कोणतेही पूजेचे साहित्य विक्री दुकानदार यांना वाजवी दरापेक्षा वाढून किंमत घेत असल्यास भाविकांनी स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार देणं आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांना वाहने अडवताना परिसरात लोकं दिसून आले त्या-त्या वेळी पोलीसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत.. खाजगी पार्किंग चालक यांना ग्रामपंचायत ने अगर तत्सम विभागाने अटी शर्ती चे परवानगीने परवानगी दिली असल्यास त्यांनी त्याबाबत पार्किंग मालक यांना त्यांचे कडे असलेले कामगार लोकं यांना ड्रेस कोड दिल्यास कोणत्या पार्किंग चे कोणते लोकं आहेत व भक्तांची लूट करणारे कोण यावर आळा घालायला पोलिसांना सोयीस्कर होईल.

शनिशिंगणापूर

गावातील बऱ्याच घर मालकांनी जागा, घर राहायला वापर करायला भाड्याने दिलेले आहेत. परंतु, सदर लोकांचे ओळखपत्र त्यांना ओळखणारे इसम याबाबत काही कागदपत्र घेतलेली दिसून येत नाही .यातुन गुन्हेगाराने गुन्हा केल्यास त्याला शोधणे ही वेळ लागणारी प्रक्रिया निर्माण होणारी आहे. वाहन चालविताना परवाना, आर सी बुक, विना वाहन क्रमांक व सोबत ठेवायची तत्सम कागदपत्रे नसल्याने आज पावेतो मोटार वाहतुकीची अनेक केसेस करून दंडात्मक कारवाई वेळोवेळी करण्यात आलेली आहे.

शनिशिंगणापूर

गावातील माजी सरपंच शिवाजीराव शेटे यांना त्यांचे यश राज परमिट रूम येथे त्यांना मारहाण करणारे आरोपी यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेता दोन आरोपी चौवीस तासाच्या आत अटक केली. इतर आरोपी यांचा शोध घेणे सुरु असून अटक केलेले आरोपी हे योग्य तपास सुरु असल्याने अद्याप पर्यंत जामीनावर बाहेर आलेले नाही.

परिसरातील लोकांनी पोलिसांना योग्य ते सहकार्य करावे. शनि शिंगणापूर येथे दर्शना साठी जिलह्या तुन,, राज्यातुन तसेच देशातुन येणाऱ्या भाविकांची अडवणूक केल्यास त्यांनी किंवा सुजान नागरिकांनी पोलिसांना वेळेत तक्रार द्यावी. पोलिसांबाबत चुकीचे बोलून अप्रीतीची भावना जनमाणसात निर्माण करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.
– आशिष शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनिशिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *