नेवासा – ज्ञानोबा तुकाराम चा जय घोष,टाळ मृदुगाचा गजरात घोडेगाव येथून दुपारचे भोजन घेऊन शिंगवे तुकाई,पांढरीपुल येथील औद्योगिक वसाहत येथे मोठया उत्साहात ग्रंथ राज ज्ञानेश्वरी आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा आगमन झाले
माऊलीच्या रथावर जे सी बी तुन पुष्प वृष्टी करण्यात आली.पालखीची विधिवत पूजन करण्यात आले. विठ्ठल आश्रमचे गाथा मूर्ती राऊत महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वेदान्त चार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या सह विविध महाराज यांचे संत पूजन करण्यात आले. वांजोळी ,शिंगवे तुकाई परिसरातील नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवे साठी दहा जेसीबीच्या साहाय्याने सात तासात काट्या कुट्या काढून भव्य पटांगण तयार केले.

त्या भव्य प्रांगणात दिंडीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नेवासा तालुक्यातील पशुधन सेवेकरी यांनी पशु सेवा केली म्हणून विविध डॉ यांचा राऊत महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विठ्ठल आश्रम गंगापूर ,जि छत्रपती संभाजीनगर येथील गाथा मूर्ती राऊत महाराज यांचे श्रवणीय कीर्तन झाले. यावेळी धरितापंढरीची वाट,नाही संकट मुक्तीचे या संत तुकाराम महाराजांच्याअभंगा वर निरूपण केले मुखाने विठ्ठलाचे नाम घेतले पाहिजे. देहाची निर्मितीच मुक्त होण्यासाठी झाली आहे. मानव हा भाग्यवानअसून त्याने आयुष्य भगवंतांसाठी लावले पाहिजे. पंढरीच्या रस्त्याने येणाऱ्या वारकऱ्यास मुक्ती दिली पाहिजे असे भक्त पुंडलिक यांनी भगवंतास सांगितले. पंढरीच्या वाटेवर चालतांना पावला गणिक देवाचे नाम घेतले पाहिजे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.