मावा

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे मावा विक्रेत्यांवर काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.
या बाबत सविस्तर माहिती अशी दि. ६ रोजी येथील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या टपरीमध्ये जुबेर मोहंमद शेख (वय.२६) हा महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असताना ही तंबाखू व सुपारीच्या सहाय्याने मावा तयार करून तो विनापरवाना विक्री करताना मिळुन आला. त्याच्या कडून ३००० रुपये किंमतीचा तिन किलो तयार मावा जप्त करण्यात आला. तर दुसरीकडे गावातील रीक्षा स्टॅण्ड वरती अक्षय सोमनाथ फुलारे (वय.२३) याच्या टपरीमध्ये देखील ३००० रुपये किंमतीचा दोन किलो तयार मावा विक्री करताना आढळुन आल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार अनुक्रमे गुन्हा र. नं. ४०७/२०२५, ४०८/२०२५ बिएन एस चे कलम २२३,२७४,२७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

मावा
मावा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मावा
मावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *