घोडेगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी झाली. या बाबत सविस्तर माहिती अशी की कुशीनाथ देवराम आयनर (वय.३७) यांच्या राहत्या घरातून दि. १६ रोजी मध्यरात्री च्या सुमारास राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील असलेले एकुणसाठ हजार रुपये किंमतीचे सोन्याची दागिने चोरुन नेले.

तशी फिर्याद दि. १७ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. घटनेची खबर मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली . अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा र. नं. १६/२०२६ बिएन एस चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अंकुश दहिफळे हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

