अभियंता
अभियंता

नेवासा – नाशिक परिमंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अशोक मडावी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील २२० केव्ही आणि १३२ केव्हीच्या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांना भेटी देऊन कामांचा वेगवान आढावा घेतला.नुकत्याच झालेल्या या दौऱ्यात त्यांनी नेवासा, भेंडा, शेवगाव, अमरापूर, पाथर्डी आणि खांडके येथील उपकेंद्रांची मध्यरात्रीपर्यंत पाहणी केली.

अभियंता

या भेटीदरम्यान अधीक्षक अभियंता मडावी यांनी कामाच्या दर्जाबाबत तांत्रिक सूचना केल्या. फिल्डवर काम करणाऱ्या अभियंत्यांना मार्गदर्शन करतानाच, कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांची त्यांनी कानउघडणी केली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. दीपक आगळे उपस्थित होते.केवळ तांत्रिक पाहणी न करता मडावी यांनी विद्युत सहाय्यक, शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) आणि सुरक्षा रक्षकांशी आपुलकीने संवाद साधला.

अभियंता

आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या पगाराला होणाऱ्या विलंबाची त्यांनी गंभीर दखल घेतली आणि याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.फिल्डवरील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या समस्यांवर लगोलग कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक आगळे यांनीही या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अभियंता
अभियंता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अभियंता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!