आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शंकरराव गडाख

घोडेगाव : जिल्ह्यातील सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी विखे आणि थोरात हे नेते एकत्र आल्याने राजकीय संघर्ष कमी झाला आहे. त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, नेवासा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

दिवाळीनिमित्त नेवासा तालुक्यातील चांदा येथील रुक्मिणी स्वयंवर मंगल कार्यालयात माजी मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ आणि जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक कारभारी जावळे मित्र मंडळाच्या वतीने भव्य शेतकरी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.

शंकरराव गडाख

यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळींनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. सहकार क्षेत्रातील यशवंतराव गडाख यांचे योगदान संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे आणि थोरात एकत्र येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, त्यांच्या एकत्र येण्यामुळे संघर्ष कमी झाला असून, याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल.

शंकरराव गडाख

नेवासा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना गडाख म्हणाले की, यंदा मुळा धरणाचे एकाच आवर्तनात जवळपास आठ टीएमसी पाणी खर्च झाले आहे. भविष्यात उपलब्ध राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मोठी जबाबदारी तालुक्यावर आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने नियोजन केल्यास आणखी दोन आवर्तनांचे नियोजन शक्य होऊ शकते.

दुष्काळाची तीव्रता वाढत असताना तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २०१२ च्या दुष्काळात आपण सर्वांनी योग्य नियोजन करून परिस्थितीवर मात केली होती. त्याच पद्धतीने यंदाही प्रयत्न करण्याची गरज आहे.

पाण्याच्या नियोजनासाठी आपण एक महिना वाट पाहणार आहोत. या कालावधीत योग्य नियोजन झाले नाही, तर गावोगावी दिंडी काढून शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाईल. त्यानंतर दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी संघर्ष करण्यास आपण तयार आहोत. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असली तरी कौशल्यपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शंकरराव गडाख

यावेळी ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या आशिया खंडातील अग्रगण्य अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आपण सर्वप्रथम आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जवळपास ८० टक्के निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे राजकीय संघर्ष कमी झाला असून, याचा मनस्वी आनंद आहे.

यापुढील काळात तालुक्यातील संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि एकत्रितपणे काम करावे. नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शंकरराव गडाख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

चांदा गावातील जुनी पिढी आणि तरुण पिढी एकदिलाने काम करत असल्याचा विशेष उल्लेखही यशवंतराव गडाख यांनी यावेळी केला.

शंकरराव गडाख

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक कारभारी जावळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी गडाख परिवाराने प्रयत्नपूर्वक उमेदवारीची संधी उपलब्ध करून दिली. आपल्याला उमेदवारी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम गडाख परिवाराने नेहमीच केले आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा कारखान्याचे माजी चेअरमन नानासाहेब तुवर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई अंबाडे, डॉ. विनोद गुंदेचा, राजेंद्र टेमक, एन. टी. शिंदे, एकनाथ भुजबळ आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, सभापती नंदुकुमार पाटील, भगवानराव गंगावणे, मुळा कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हाइस चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी व्हाइस चेअरमन कडुबाळ कर्डिले, बापूसाहेब शेटे, प्रभाकर कोलते, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय काळे, अशोक मंडलिक, कपूर कर्डिले, माणिकराव होंडे, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, अॅड. हिम्मत देशमुख, अमोल अभंग, बाळासाहेब भणगे, प्रसाद पटारे, बाबा घुले, मदनराव डोळे, रंगनाथ जंगले, जनार्दन जाधव, अरुण सावंत, डॉ. अमृत काळे, राजेंद्र सानप, बाबासाहेब ढवाण यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध गावांतील संस्थांचे पदाधिकारी, चेअरमन, व्हाइस चेअरमन, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेवनाथ पवार यांनी केले, तर आभार बाळासाहेब जावळे यांनी मानले.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!