आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गांजा

कुकाणा : अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून, नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घरातून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ किलो १८२ ग्रॅम गांजा तसेच विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात गांजाचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार केले होते.

गांजा

दरम्यान, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी हे पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना कुकाणा येथील मुलाणीवाडा, जुम्मा मस्जिदजवळ राहणारा शाहमद मेहबुब शेख हा आपल्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित घराची झडती घेतली. यावेळी घरामध्ये तीन गोण्यांमध्ये ठेवलेला ११.१८२ किलो गांजा आढळून आला.

गांजा

पोलिसांनी शाहमद मेहबुब शेख (वय ४८, रा. मुलाणीवाडा, कुकाणा, ता. नेवासा) याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून ५ लाख ५९ हजार १०० रुपये किमतीचा गांजा, वजनकाटा, वजनमापे, स्टीलचे भांडे आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या गांजाबाबत पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील मल्हारी मोहन बोरुडे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती त्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन मल्हारी मोहन बोरुडे यालाही ताब्यात घेतले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) व २०(२)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

कुकाणा परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अवैध गांजा विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.

गांजा
गांजा
गांजा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गांजा
गांजा
गांजा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गांजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!