मेडिकल

आपला जिल्हा : रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या औषध विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडागा उगरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विनाप्रिस्क्रिप्शन औषधे देणे आणि तांत्रिक नियमांचे उल्लंघन करणे अशा औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द करणे गरजेचे आहे.

मेडिकल

या सर्व दुकानांची नियमित आणि प्रभावी तपासणी करणे गरजेचे असताना अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी काही अंशी कमकुवत झाली असून, त्याचाच फायदा काही बेशिस्त विक्रेते घेत असल्याचे दिसून येते.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार औषध निरीक्षकांमार्फत औषध विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. विनाप्रिस्क्रिप्शन औषध विक्री, फार्मसिस्टची अनुपस्थिती, तापमानाचे नियम न पाळणे व इतरही तांत्रिक त्रुटी आढळल्यास नोटीस बजावली जाते आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाते. ग्राहकांनीही औषध घेताना पक्के बिल मागणे बंधनकारक आहे.

मेडिकल

कालबाह्य औषध घेतल्यास रिअॅक्शन येणे किंवा प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका असतो.
मेडिकल स्टोअरमध्ये एक्सपायर्ड औषधांसाठी स्वतंत्र कप्पा असणे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु अनेकदा ती विक्रीसाठी ठेवल्याचे आढळते.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी राहिली आहेत. या रुग्णालयांच्या बरोबरीनेच प्रत्येक गल्लीबोळात औषधालयांचे जाळे पसरले आहे. मात्र, व्यवसाय वाढवण्याच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी औषध विक्रीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

मेडिकल

परवाना एकाचा, चालवितो दुसराच

अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये ज्या फार्मसिस्टच्या नावाने परवाना घेतला आहे, तो प्रत्यक्ष दुकानात नसतो. परवाना भाड्याने देऊन अननुभवी व्यक्तींकडून औषध विक्री केली जात असल्याचे अनेक तपासण्यांतून स्पष्ट झाले आहे. तांत्रिक माहिती नसलेली व्यक्ती चुकीचे औषध देण्याची शक्यता अधिक असते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मेडिकल
मेडिकल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मेडिकल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!