
नेवासा : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बिजेनिमित्त गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याची नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरुवार २६ फेब्रुवारी ते गुरुवार ५ मार्च २०२६ या कालावधीत हा सोहळा होत असल्याची माहिती संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांनी दिली.

यावर्षी होणाऱ्या बिजोत्सव सोहळ्यात पहाटे ४ ते ५ काकडा, सकाळी ७ ते ११.३० गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तर सायंकाळी संत श्री तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्य अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून सायंकाळी ७.३० ते रात्री १० यावेळेत संगीत श्रीमद भागवत कथा व नंतर भोजनप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

श्रीक्षेत्र नेवासा, नेवासा फाटा परिसर, नेवासा बुद्रुक व परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने पार पडणाऱ्या या सोहळयासाठी सर्व स्नेही मंडळींनी प्रतिवर्षी अन्नदान, संतपूजन इत्यादी सेवेमध्ये आपले अनमोल योगदान दिलेले आहे.

या ही वर्षी होणाऱ्या बिजोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी कथा श्रवणाचा व होणाऱ्या गाथा पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, विश्वस्त अंकुश महाराज जगताप, श्री संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

