नेवासा – नेवासा येथील जनसेवक स्वर्गीय राजेंद्र मापारी व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ.सीमाताई राजेंद्र मापारी या दाम्पत्याच्या स्मृती प्रित्यर्थ नेवासा येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात प्रसिध्द व्याख्याते प्रा.विनोद बाबर यांच्या आयोजित व्याख्यानाला नेवासकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी झालेल्या व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,सौ.सुनीताताई गडाख, नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,श्री चक्रधर स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महंत धनंजय मुनी,ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर संजय गोरे,जैन समाजाचे विचारवंत रमेश ओस्तवाल,शीख समाजाचे सेवक बंडू सचदे,मौ. जाकिरभाई शेख,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, उपनगराध्यक्षा सौ.शालिनीताई सुखदान,जनसेवक अँड.संजय सुखदान,पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्याख्याते प्रा.विनोद बाबर म्हणाले की चांगल्या व वाईट वेळेत फक्त आई बापच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात,जो आईबापांच्या सन्मान करतो त्याचा जग सन्मान करतो,आजच्या युगात आईबाप आज कळत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली

नगरसेवक स्वप्नील मापारी व अँड.अनिकेत मापारी यांचे वडील राजेंद्र मापारी यांनी समाजामध्ये राहून केलेले चांगल्या कर्मामुळे व त्यांची पुण्याई म्हणूनच आज मोठ्या प्रमाणात ही गर्दी जमली असल्याचे त्यांनी सांगितले.
माणसांच्या हदयात घर करण्याचे काम जनसेवक राजू भाऊ मापारी यांनी केले त्यांची नीतिमत्ता चांगली होती म्हणून नेवासकर नागरिक ही त्यांच्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा पिढीला आवाहन करतांना प्रा.विनोद बाबर म्हणाले की मुलांनो जीवनात यशस्वीपणे वाटचाल करायची असेल तर आपली संगत पहिली चेक करा,बाप आहे तर आयुष्यात चांगले संस्कार आहे असे सांगून त्यांनी आयुष्यातले गुपित चार चौघात कधीही सांगू नका, आपल्या शरीर नावाच्या संपतीला जपा,आईवडीलांचा आदर व सन्मान करा त्यांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर मोठे होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम संयोजक नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी उपस्थित हजारो नागरीकांचे आभार मानले.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित महिला व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सर्वपक्षीय पदाधिकारी,सर्व नगरसेवक, वकील संघाचे पदाधिकारी सदस्य,विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने स्वर्गीय राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ.सीमाताई मापारी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







