निवडणूक प्राधिकरणाचे तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
नेवासा- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया आता ‘जैसे थे’ थांबल्या होत्या, तेथूनच तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, यामुळे राज्यातील हजारो सहकारी संस्थांमध्ये आता निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत.

निवडणुका का थांबल्या होत्या?
राज्य शासनाने ५ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. केवळ उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांच्या निवडणुका यातून वगळण्यात आल्या होत्या. मात्र, नुकत्याच १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘सार्वत्रिक निवडणुका पार संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या होत्या, त्या त्याच टप्प्यापासून पुढे सुरू कराव्यात.

अ आणि ब वर्गातील ज्या संस्थांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जिल्हा किंवा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठवायचा आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. विशेष म्हणजे, संघीय संस्थांच्या निवडणुकांसाठी ज्या सभासद संस्थांनी आधीच आपले प्रतिनिधी ठराव सादर केले आहेत, त्यांना पुन्हा नवीन ठराव देण्याची आवश्यकता भासणार नाही.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

