आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
विनयभंग

मारहाणीत जखमी झालेल्या इयत्ता दहावीच्या मुलीचे बोर्ड परीक्षा हुकली! आरोपीवर कडक कलमानवे गुन्हे दाखल करण्याची उपोषणार्थी महिलेची मागणी!

विनयभंग

नेवासे (प्रतिनिधी) – रामडोह (ता.नेवासे) येथील गावातील काही गुंडानी एका निराधार महिलेच्या घराचे गेट तोडून तीला व तीच्या आई – वडील आणि मुलीला जब्बर मारहाण करून या महिलेची छेडछाड करून तीचा विनयभंग केल्याप्रकारणी या गुन्ह्यातील संबंधित आरोपींवर वाढीव कलमान्वे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनीषा लकारे ही तीच्या वृद्ध आई आणि मुलीला बरोबर घेवून शनिवार (दि.28) रोजी सकाळी 10 वाजेपासून नेवासे पोलीस ठाण्यासमोर आपल्या न्यायहक्कासाठी अमरण उपोषणास बसली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, रामडोह येथील मनीषा लकारे या महिलेला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या महिला – पुरुष मंडळींनी तीच्या घराचे गेट तोडून तीला व तीच्या वृद्ध आई – वडील तसेच लहान मुलीला बेदम मारहाण करून तीचा विनयभंग केला तसेच या मारहाणीत ती आणि तिची मुलगी गंभीर जखमी झाल्यामुळे इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या तीच्या मुलीची बोर्ड परीक्षा बुडालेली असून संबंधित आरोपीवर नेवासे पोलीस ठाण्यात वाढीव कलमांन्यवे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनीषा लकारे ही महिला आपल्या आई आणि लेकीला सोबत घेवून शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसली आहे.

या महिलेने संबंधित आरोपीवर नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा गावातील काही गुंडानी या महिलेला “तु आमच्या विरुद्ध फिर्याद का दाखल केली” असे म्हणून या फिर्यादीतील आरोपीने आणि गावातील काही महिलांना बरोबर घेवून हातात काठ्या,कोयते घेवून फिर्यादी महिलेच्या घरात घुसून मारहाण,विनयभंग आणि घरातील काही पैसे आणि सोने चोरी केल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपिंवर वाढीव कलमान्यवे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ही महिला अमरण उपोषणास बसली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विनयभंग
विनयभंग
विनयभंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विनयभंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!