युवकांचा मृत्यू
युवकांचा मृत्यू

शेवगाव : रस्ता ओलांडत असताना तोल गेल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना शेवगाव शहरातील फलके कॉम्प्लेक्स समोर मिरी रोड येथे शनिवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

युवकांचा मृत्यू

निखील सोमनाथ पठाडे (वय २०) व प्रतीक सचिन शिंदे (वय १९) दोघेही रा. वरूर बुद्रुक, ता. शेवगाव अशी मयत तरुणांची नावे आहेत. मयत तरुण हे इंदिरानगर भागातील मित्राला सोडून शेवगाव-मिरी रस्ता ओलांडत होते, त्यावेळी शेवगांवहून नगरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या मागच्या चाकाखाली फलके कॉम्प्लेक्स समोर या दोन तरुणांचा तोल जाऊन ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून एकाचा जाग्यावरच, तर दुसऱ्याचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला.

युवकांचा मृत्यू

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

युवकांचा मृत्यू
युवकांचा मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

युवकांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!