आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सायरन

नेवासे – नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये लोक पैसे काढण्यासाठी आले की, काही वेळेस या एटीएम मशीनचे सायरन अचानक वाजत असल्यामुळे येथे पैसे येणारे लोक हे आवाजाने गरबडून जात आहे. रात्रीच्या वेळी येथे पैसे काढण्यासाठी आलेली नवखी मंडळी एटीएमचा सायरन अचानक वाजू लागल्यामुळे पैसे न काढताच निघून जात असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. या एटीएम मशीनच्या सायरनचा अचानक येणारा आवाज बंद करण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.

राजमुद्रा चौकात असलेल्या या एटीएममध्ये काही वेळेस महिलाही येत असून, अचानक सायरन वाजू लागल्यामुळे येथे येणाऱ्या महिलाही चांगल्याच गरबडून जाताना दिसून येत आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या एका पान स्टॉल चालकाला घाबरू नका, हे सायरन असेच वाजत असते, असे येथे आलेल्या लोकांना समजावून सांगावे लागत आहे. या एटीएमची मात्र दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

सायरन
सायरन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सायरन
सायरन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सायरन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!