अत्याचार

Ahilyanagar Crime : धर्माच्या नावाने कीर्तन अन् बंद दाराआड अल्पवयीन मुलीवर क्रूर अत्याचार! अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये एका पाखंडी कीर्तनकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे. गेल्या 5 वर्षांपासून एका 17 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या या नराधमाने, क्रूरतेचा कळस गाठत तिला गरम पक्कडीचे चटकेही दिले. वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरलेल्या या ‘अण्णासाहेब महाराजाचा’ खरा चेहरा समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, संतप्त ग्रामस्थांनी या भोंदूला कठोर फाशीची मागणी केली आहे.

अत्याचार



Ahilyanagar Crime news: वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून एका वासनांध कीर्तनकाराने गेल्या पाच वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपुरी गावात हा संतापजनक प्रकार घडला असून, आरोपीने पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत, तर तिला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाणही केली आहे.

अत्याचार

कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अनेकदा अत्याचार 

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता आणि आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती आणि मुलगी घरी एकटी असताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली होती.

अत्याचार

बांबूने बेदम मारहाण , लोखंडी पक्कड गरम करुन दिले चटके

या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला जेव्हा आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला अमानुष चटके दिले. या अमानुष मारहाणीनंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला असून या छळामुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते.

गंभीर अवस्थेत असलेल्या पीडितेने 14 मार्च रोजी भावाकडे सर्व आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी यशवंत थोरात याला 15 मार्च रोजी पहाटे राहत्या घरातून अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून भोंदू महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

अत्याचार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अत्याचार
अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अत्याचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!