
घोडेगाव– नेवासा तालुक्यातील झापवाडी येथे एका शेतकऱ्याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील संदिप बद्रीनाथ काळे (वय.४०)रा.झापवाडी लोहगाव यांनी ६ रोजी. स्वतः शेतात झापवाडी येथे कोणते तरी विषारी औषध प्राषन केल्याने भाऊ गणेश गोविंद काळे यांनी त्यांना अहील्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दि. ७ रोजी दुपारी १२.४८ वाजता उपचार सुरू असताना मयत झाल्याचे येथील डाॅक्टरांनी सांगितले. डाॅक्टरांच्या खबरी वरून सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







