
नेवासा: तालुक्यातील प्रवरा संगम येथे सामाजिक सद्यस्थिती यावर विचार मंथन झाले. मा. आमदार लहुजी कानडे यांनी सध्याच्या सामाजिक स्थितीबाबत अनेक मुद्दे विस्ताराने मांडले. फुले यांनी सत्य प्रबोधन सर्वप्रथम या देशामध्ये आग्रही मांडणी करून समाजासमोर आणले. समाजाने नेहमी सत्य विचाराला प्राधान्य दिले पाहिजे फुलेंचा सत्याचा विचार पुढे महात्मा गांधी यांनी अंगीकारला. आजही सत्य विचाराची गरज चळवळीच्या माध्यमातून उभी राहणे आवश्यक आहे. वैचारिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे होते.

डॉक्टर ढगे यांनी शास्त्रज्ञांनी संशोधनावर समाजापुढे सत्याची चळवळ उभारणी काळाची गरज असल्याचे प्रतिपादित केले. आज शेतकरी उपेक्षित व दुःखी आहे जगातल्या 220 पैकी फक्त भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा मसुदा*राज्यस्तरीय पातळीवर तयार करण्यात आल्याची त्यांनी सांगितले शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर ढगे यांनी केले आरपीआय चे नेते साईनाथ शिरसाट यांनी राखीव जागा बाबत प्रश्न उपस्थित केला व हळूहळू आरक्षण कमी होत जाणार अशी शंका निर्माण केली.

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे ऊस शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश हापसे यांनी ए आय तंत्रज्ञानाचा उहापोह केला. माजी विधानसभा सदस्य लहुजी कानडे यांनी उसाचे उत्पादन खर्च एकरी किमान दहा हजार रुपये कमी करण्यासाठी व उत्पादनात एकरी वाढ होण्यासाठी तंत्रज्ञान वापर कसा करता येईल यासाठी प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना श्रीरामपूर तालुक्यात उसासाठी मार्गदर्शनाची सोय करणार असल्याचे अधोरेखित केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







